तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-४

 


तू आनंदी रहा, पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... 

भाग- ४

नमस्कार मैत्रिणींनो, 

तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणीला खंबीरपणे सामोरे जाता का? तुम्ही उपचार घेत असताना विश्वास ठेवता का? तुम्ही तुमची जीवनशैली जगताना आरोग्यदायी सूत्र वापरता का? तुम्हाला असं वाटतं का की आपण विचार करण्याची पद्धत जर बदलली तर आपल्या आयुष्यात देखील बदल घडू शकतो? वरील पैकी एका प्रश्नाचे उत्तर  जर 'हो' असेल तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत वाचा...

मी सोनिया खुणे (Proud police wife



चला तर मग सुरवात करूया, आपण पहात आहोत पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स..

परंतु तत्पूर्वी मी आपल्याला एक inspirational  गोष्ट सांगणार आहे. ती एका महिलेची आहे, तिने खूप बिकट परिस्थितीवर मात करून ,आज आपल्या देशाचे नाव जगात उंचावले आहे.  ती महिला कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच  उत्सुक असाल...



चला तर मग सुरुवात करुया...

आज आपण मीराबाई चानू जिने टोकीओ ऑलम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल मिळवून दिले. अशा मीराबाई चानू बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तिचा जन्म मणिपूरची राजधानी इंफाळ जवळील एका गावामध्ये झाला. तिला  लहानपणापासूनच घरातील कष्टदायक काम करायला लागे. जळणासाठी लाकडे उचलून आणावे लागत. ती लाकडाची मोळी उचलून आणत असे जी तिच्या मोठ्या भावालाही उचलणं शक्य नसे. 

तिला एन कुंजुरानी देवीला पाहुन मोटिवेशन व प्रेरणा मिळाली. तिची ताकद पाहून तिला वेटलिफ्टिंगमध्ये करियर करायचे ठरविले आणि तिने सराव सुरू केला.  मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये बरीच पदके मिळवली. तिला तिच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने २०१८ साली पद्मश्री पुरस्काराने व राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित केले. सद्या चालू असलेल्या टोकीओ २०२० ऑलिम्पिकमध्ये तिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहे. आपल्या सर्वांना ते माहितीच आहे, कारण सध्या सर्वत्र मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खरंच ना किती बिकट परिस्थिती असून देखील मीराबाईने भारताला सिल्व्हर मेडल मिळवून दिले, खरंच एक महिला असून देखील वेटलिफ्टिंग सारख्या खेळामध्ये तिने मेडल मिळवून दिले ही खूप कौतुकास्पद बाब आहे.


आपण या अगोदरच्या भाग १, भाग २भाग ३ मध्ये काही टिप्स पाहिल्या आहेत. आता आपण पुढील टिप्स पाहणार आहोत.

 

 १०. कशा पद्धतीने कराल स्वतःच्या अडचणीवर मात-



अडचणी आपल्या जीवनाचा भाग आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्येक अडचणीचे निरसन असतेच. जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो, एखाद्या समस्येमध्ये असतो तेव्हा परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला मदत करायला येत असतो. जास्त चिंता केल्यामुळे आपली शक्ती कमी होते, अशावेळी आपण शांत रहायला शिकले पाहिजे आणि आपल्या समस्येचे Solution शोधले पाहिजे.

असे म्हणतात ना...

समस्या है तो समाधान भी है!

जसे की,

प्रश्न असेल तर उत्तर  ही असतेच. 

उदाहरणार्थ: आपल्या मुलांची परीक्षा असली की आपल्याला त्यांची खूप चिंता वाटायला लागते तेव्हा आपण जास्त चिंता न करता शांत राहून स्वतःला मुलांच्या ठिकाणी ठेवून विचार करायला पाहिजे म्हणजे आपल्याला जास्त चिंता वाटणार नाही आणि मुलांना परीक्षेच्या काळामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो आणि त्यांना विश्वास देऊ शकतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. 


११.विश्वास उपचारासाठी खूप महत्त्वाचा आहे-



 विश्वास आपले स्वास्थ्य ठीक करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विश्वास हा परमेश्वराच्या न दिसणाऱ्या  हातासारखा आहे. जो नेहमीच आपल्या बरोबर असतो.

 Faith is like unseen hand of God. 

उदाहरणार्थ:आपण आजारी पडलो की प्रथम आपण डॉक्टरांकडे जातो. आपले काय दुखणे आहे ते सांगतो आणि डॉक्टर आपल्याला गोळ्या लिहून देतात आणि त्यावेळी आपल्याला बरे वाटते कारण आपला डॉक्टरांवर विश्वास असतो आणि आपण हॉस्पिटलला गेलो की आपले दुखणे 50% बरे होऊन जाते. आपण असे बऱ्याच लोकांना म्हणताना ऐकले असेल की, त्या अमुक-अमुक डॉक्टरांचाच मला गुण येतो. म्हणजे काय तर त्या डॉक्टरांवर विश्वास असतो आणि त्यामुळे त्याला डॉक्टरांकडे गेले की बरे झाल्यासारखे वाटते. यावरूनच असे म्हणता येईल की आपली मानसिक स्थितीचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. 

Mental state has a positive effect on health.

 

 १२.आरोग्यदायी सूत्र वापरून जीवनशैली बदला-



चिडचिडेपणा, राग, तिरस्कार यामुळे आपली तब्येत खराब होते. परंतु जर आपण चिडचिडेपणा, राग व तिरस्कार यांचे रूपांतर विश्वास, प्रेम, माफीत केले तर आपले जीवन आनंदी बनून जाईल. हे आरोग्यदायी सूत्र वापरून आपली जीवनशैली बदलू शकतो. 

उदाहरणार्थ: एक दहा वर्षाची मुलगी खूप आजारी पडते कारण तिला तिच्या आजी-आजोबांना सोडून परगावी जायचे नसते. त्यामुळे तिला खूप ताप येतो परंतु जेव्हा मुलीला तिचे आई वडील सांगतात की आपण परगावी नाही जाणार, आपण आजी आजोबां बरोबरच राहणार आहोत. हे ऐकून मुलीचा ताप कमी होतो. म्हणजेच काय तर त्या  मुलीला रागवण्यापेक्षा, तिच्यावर चिडचिड करण्यापेक्षा तिला प्रेमाने समजावून तिला विश्वासात घेणे खूप महत्त्वाचे आहे. 


१३.आपले विचार आपलं आयुष्य बदलू शकतात-



 आपले विचार खूप ताकदवर असतात. आपण जसे विचार करतो तसेच आपण बनत असतो. आपण आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकले पाहिजे. आपण आपले नकारात्मकविचार बदलून सकारात्मकतेने जीवन जगले पाहिजे. 

Law which can help us constantly That is belive and succeed.

उदाहरणार्थ: आपल्याला माहिती आहे की शासन स्पर्धा परीक्षा घेत असते, त्यासाठी  हजारो विद्यार्थी फॉर्म भरत असतात. परंतु त्यातील काही विद्यार्थ्यांची निवड  होणार असते. निवड झालेला विद्यार्थी परिक्षेकडे इतरांपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनाने पाहतो आणि त्याप्रमाणे अभ्यास करतो. आणि तो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो. आपण जे लोक करतायंत तेच केले तर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही त्यासाठी आपल्याला इतर लोकांपेक्षा वेगळा विचार करून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. 


जर तुम्ही स्वतःच्या अडचणीवर मात करायला शिकला असाल ,जर तुम्ही विश्वासाचा आधार घेऊन उपचार करायला शिकला असाल, जर तुम्ही आरोग्यदायी सूत्र वापरून जीवनशैली बदलायला शिकला असाल, जर तुम्ही नवीन विचार करून आयुष्य बदलायला शिकला तर तुम्ही नक्कीच सकारात्मक व आनंदी जीवन जगायला शिकाल.

मला असे अजूनही बरेचसे पाॅईंट तुमच्या सोबत शेअर करायचे आहेत.ते पुढील भागात पाहू. 

 

मैत्रीणीनों, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंगने एखाद्यीचं आयुष्य ही बदलू शकतं. 

 तुम्हाला काही समस्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा. तसेच तुम्हीं माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता. कम्युनिटी जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. 👉🏼मी हिम्मत पोलीसांची मी हिम्मत पोलीसांची. 



माझा हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत वाचल्या बद्दल मी तुमची खूप आभारी आहे.🙏🏻



माझा या अगोदरचा ब्लॉग भाग १ , भाग २ व भाग ३ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


भाग-१ लिंक 👉🏻https://mehimmatpolisanchi.blogspot.com/2021/06/blog-post.html?m=1

भाग-२ लिंक👉🏻

https://mehimmatpolisanchi.blogspot.com/2021/06/blog-post_15.html?m=1

भाग-३ लिंक👉🏻

https://mehimmatpolisanchi.blogspot.com/2021/07/blog-post.html?m=1


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा