पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक दिन

इमेज
  नमस्कार मैत्रिणींनो, आज प्रथमच मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आले आहे. माझा आजचा विषय आहे "पुस्तक दिन". तुम्ही म्हणाल पुस्तक दिन, हो कारण आपण सर्वजणी आपल्या संसारामध्ये नोकरीमध्ये अगदी लोणच्या प्रमाणे मुरलेलो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामधील पुस्तकाचे स्थान फारच दुर्मिळ झाले आहे. माझ्या काही मैत्रिणी पुस्तक वाचत असतील परंतु त्यादेखील अगदी बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. म्हणून मी आज पुस्तक दिनाचे औचित्य साधून तुम्हाला भेटायला आले आहे. आपण मागे आपल्या शालेय जीवनात जर गेलो तर आपल्या सर्वांना आठवेल की शाळेच्या भिंतीवर किंवा फळ्यावर नेहमी एक वाक्य लिहिलेले असायचे ते म्हणजे "वाचाल तर वाचाल" तेव्हा अगदी आपण नित्यनेमाने वाचत असायचो. आपले शिक्षक देखील आपल्याला सांगायचे शालेय पुस्तकां बरोबर अवांतर पुस्तके वाचत जा,आपण सर्वजणी तेव्हा पुस्तक वाचन करायचो, परंतु आता आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की,'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' याचा अर्थ असा की ग्रंथरूपी ज्ञानाला महाराज संपत्ती समजतात या संपत्तीची बरोबरी सोने, चांदी किंवा रत्नाशी होत नाही. ...

आनंदी आयुष्याची सप्तपदी

इमेज
  आनंदी आयुष्याची सप्तपदी सप्तपदी हा शब्द ऐकला तरी आपल्याला आपल्या लग्नातील सप्तपदी आठवते हिंदू धर्मातील लग्नातील   सर्वात महत्वाची रीत म्हणजे सप्तपदी. सप्तपदी ही अग्निच्या साक्षीने सात फेरे घेऊन वधू-वरांनी एकमेकांना सुखी संसारासाठी दिलेली सात वचने असतात आणि या नंतरच वधू आणि वर अधिकृत नवरा-बायको होतात .जशी आपण लग्नावेळी आपल्या साथीदाराला सात वचने देतो तसेच आपण आनंदी रहावे म्हणून आपल्या स्वतःला सात वचने द्यायची आहेत. सातत्याने रोज ही सप्तपदी आपल्याला पुर्ण करायची आहे. तुम्हाला असे कमीत कमी २१ दिवस तरी करायची आहे. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच २१ दिवसांमध्ये जाणवेल.  चला तर मग मैत्रीणीनों आपण ती सप्तपदी कोणती ते पाहूयात.....  १. कृतज्ञता             मैत्रीणीनों, आता तुम्ही म्हणाल कृतज्ञता म्हणजे नक्की काय करायचे, तर आपल्याला हे जीवन परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम डोळे बंद  करुन परमेश्वराचे मनापासून आभार मानायचे आहेत. यानंतर  आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या सर्व लोकांनी मदत केलेली आहे. ...