पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...

इमेज
पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...  भाग-२ नमस्कार मैत्रिणींनो, आपण पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स पाहत आहोत. आपण यामध्ये तीन पॉईंट पाहिलेत.  १.स्वतःवर विश्वास ठेवा.  २.मन शांत ठेवा.  ३.सतत ऊर्जा कशी     एकसमान ठेवाल.    वरील पॉईंट मध्ये आपण सकारात्मकतेने कसे जगू शकतो हे पाहिले. माझ्या  भाग-१   ब्लॉगसाठी तूम्ही खूप छान प्रतिक्रिया दिल्यात त्यामुळे मी तुमची अत्यंत आभारी आहे. त्यामुळेच मी तुमच्यासाठी आज सकारात्मकतेने जगण्याचे आणखी काही पॉईंट समोर घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की वाचा. मी सोनिया खुणे (PROUD POLICE WIFE) मी हिम्मत पोलिसांची या ग्रुपची संस्थापिका.मला येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व आनंदाने जगायला शिकविणे हाच माझा ध्यास आहे. चला तर मग आपण पुढचे पॉईंट पाहूयात...  ४.प्रार्थना शक्तीचा अनुभव घ्या_ आपण बऱ्याच सिनेमा मध्ये पहात असतो की अभिनेता किंवा अभिनेत्री चा एक्सीडेंट झालेला असतो आणि ड...

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...

इमेज
पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...  भाग-१   नमस्कार मैत्रिणींनो, एक पोलिस पत्नी म्हणून तुम्ही सातत्याने तणाव अनुभवता का? बऱ्याच वेळेला तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायच्या असून देखील तुम्ही आळस करता का? तुमच्या ही मनात असे प्रश्न येतात का? जर वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी आहे.   तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.चला तर मग सुरुवात करुया... आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विचार माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात आपण पाहतो कि मानवाबरोबर इतर पशुपक्षी देखील भूतलावर राहतात. परंतु फक्त मानवालाच विचार करण्याची ताकद आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या असे म्हणतात, की माणूस एका दिवसामध्ये ६० हजारांपेक्षा जास्त वेगवेगळे विचार करतो त्यात नकारात्मक व सकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, झोपताना सकाळी पाच वाजताचा अलार्म लावून झोपतो सकाळी वाजायला लागला की मनामध्ये दोन विचार येतात बंद कर आणि झोप जरा वेळ आणि त्याच वेळेला दुसरा एक विचार येतो पाच वाजल...