तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-४
तू आनंदी रहा, पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग- ४ नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणीला खंबीरपणे सामोरे जाता का? तुम्ही उपचार घेत असताना विश्वास ठेवता का? तुम्ही तुमची जीवनशैली जगताना आरोग्यदायी सूत्र वापरता का? तुम्हाला असं वाटतं का की आपण विचार करण्याची पद्धत जर बदलली तर आपल्या आयुष्यात देखील बदल घडू शकतो? वरील पैकी एका प्रश्नाचे उत्तर जर 'हो' असेल तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत वाचा... मी सोनिया खुणे ( Proud police wife ) चला तर मग सुरवात करूया, आपण पहात आहोत पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स. . परंतु तत्पूर्वी मी आपल्याला एक inspirational गोष्ट सांगणार आहे. ती एका महिलेची आहे, तिने खूप बिकट परिस्थितीवर मात करून ,आज आपल्या देशाचे नाव जगात उंचावले आहे. ती महिला कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल... चला तर मग सुरुवात करुया... आज आपण मीराबाई चानू जिने टोकीओ ऑलम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल मिळवून दिले. अशा मीराबाई चानू बद्दल आपण माहिती पाहणार आहो...