पोस्ट्स

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-४

इमेज
  तू आनंदी रहा, पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...  भाग- ४ नमस्कार मैत्रिणींनो,  तुम्ही तुमच्या वैयक्तिक अडचणीला खंबीरपणे सामोरे जाता का? तुम्ही उपचार घेत असताना विश्वास ठेवता का? तुम्ही तुमची जीवनशैली जगताना आरोग्यदायी सूत्र वापरता का? तुम्हाला असं वाटतं का की आपण विचार करण्याची पद्धत जर बदलली तर आपल्या आयुष्यात देखील बदल घडू शकतो? वरील पैकी एका प्रश्नाचे उत्तर  जर 'हो' असेल तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत वाचा... मी सोनिया खुणे ( Proud police wife )  चला तर मग सुरवात करूया, आपण पहात आहोत पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स. . परंतु तत्पूर्वी मी आपल्याला एक inspirational  गोष्ट सांगणार आहे. ती एका महिलेची आहे, तिने खूप बिकट परिस्थितीवर मात करून ,आज आपल्या देशाचे नाव जगात उंचावले आहे.  ती महिला कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच  उत्सुक असाल... चला तर मग सुरुवात करुया... आज आपण मीराबाई चानू जिने टोकीओ ऑलम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल मिळवून दिले. अशा मीराबाई चानू बद्दल आपण माहिती पाहणार आहो...

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-३

इमेज
  तू आनंदी रहा, पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...  भाग- ३ नमस्कार मैत्रीणीनों,  तुम्ही ज्याची अपेक्षा करता  तुम्हाला ते मिळते का ?तुम्हाला कधी अपयश येते का? तुम्ही जास्त चिंता करता  का? वरील प्रश्नापैकी एक जरी प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत वाचा.. मी सोनिया खुणे (PROUD POLICE WIFE)  " मी हिम्मत पोलिसांची"  या ग्रुपची संस्थापिका. मला येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व त्यांना आनंदाने जगायला शिकविणे हाच माझा ध्यास आहे.  चला तर मग सुरुवात करूयात, आपण पहात आहोत पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स-  आपण या अगोदरच्या भाग१  व  भाग २ मध्ये काही टिप्स पाहिल्या आहेत. आता आपण पुढील टिप्स पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक सत्यघटना मी  तुम्हाला सांगणार आहे.  मैत्रिणींनो,आज आपण जबरदस्त सकारात्मकता असलेल्या एका माउंटेनिअरची सत्य घटना पाहणार आहोत. अरुणिमा सिन्हा यांचा जन्म २० जुलै १९८८ साली उत्तर प्रदेश मधील आंबेडकर नगर ...

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...

इमेज
पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...  भाग-२ नमस्कार मैत्रिणींनो, आपण पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स पाहत आहोत. आपण यामध्ये तीन पॉईंट पाहिलेत.  १.स्वतःवर विश्वास ठेवा.  २.मन शांत ठेवा.  ३.सतत ऊर्जा कशी     एकसमान ठेवाल.    वरील पॉईंट मध्ये आपण सकारात्मकतेने कसे जगू शकतो हे पाहिले. माझ्या  भाग-१   ब्लॉगसाठी तूम्ही खूप छान प्रतिक्रिया दिल्यात त्यामुळे मी तुमची अत्यंत आभारी आहे. त्यामुळेच मी तुमच्यासाठी आज सकारात्मकतेने जगण्याचे आणखी काही पॉईंट समोर घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की वाचा. मी सोनिया खुणे (PROUD POLICE WIFE) मी हिम्मत पोलिसांची या ग्रुपची संस्थापिका.मला येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व आनंदाने जगायला शिकविणे हाच माझा ध्यास आहे. चला तर मग आपण पुढचे पॉईंट पाहूयात...  ४.प्रार्थना शक्तीचा अनुभव घ्या_ आपण बऱ्याच सिनेमा मध्ये पहात असतो की अभिनेता किंवा अभिनेत्री चा एक्सीडेंट झालेला असतो आणि ड...

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...

इमेज
पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...  भाग-१   नमस्कार मैत्रिणींनो, एक पोलिस पत्नी म्हणून तुम्ही सातत्याने तणाव अनुभवता का? बऱ्याच वेळेला तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायच्या असून देखील तुम्ही आळस करता का? तुमच्या ही मनात असे प्रश्न येतात का? जर वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी आहे.   तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.चला तर मग सुरुवात करुया... आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विचार माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात आपण पाहतो कि मानवाबरोबर इतर पशुपक्षी देखील भूतलावर राहतात. परंतु फक्त मानवालाच विचार करण्याची ताकद आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या असे म्हणतात, की माणूस एका दिवसामध्ये ६० हजारांपेक्षा जास्त वेगवेगळे विचार करतो त्यात नकारात्मक व सकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, झोपताना सकाळी पाच वाजताचा अलार्म लावून झोपतो सकाळी वाजायला लागला की मनामध्ये दोन विचार येतात बंद कर आणि झोप जरा वेळ आणि त्याच वेळेला दुसरा एक विचार येतो पाच वाजल...

पुस्तक दिन

इमेज
  नमस्कार मैत्रिणींनो, आज प्रथमच मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आले आहे. माझा आजचा विषय आहे "पुस्तक दिन". तुम्ही म्हणाल पुस्तक दिन, हो कारण आपण सर्वजणी आपल्या संसारामध्ये नोकरीमध्ये अगदी लोणच्या प्रमाणे मुरलेलो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामधील पुस्तकाचे स्थान फारच दुर्मिळ झाले आहे. माझ्या काही मैत्रिणी पुस्तक वाचत असतील परंतु त्यादेखील अगदी बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. म्हणून मी आज पुस्तक दिनाचे औचित्य साधून तुम्हाला भेटायला आले आहे. आपण मागे आपल्या शालेय जीवनात जर गेलो तर आपल्या सर्वांना आठवेल की शाळेच्या भिंतीवर किंवा फळ्यावर नेहमी एक वाक्य लिहिलेले असायचे ते म्हणजे "वाचाल तर वाचाल" तेव्हा अगदी आपण नित्यनेमाने वाचत असायचो. आपले शिक्षक देखील आपल्याला सांगायचे शालेय पुस्तकां बरोबर अवांतर पुस्तके वाचत जा,आपण सर्वजणी तेव्हा पुस्तक वाचन करायचो, परंतु आता आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की,'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' याचा अर्थ असा की ग्रंथरूपी ज्ञानाला महाराज संपत्ती समजतात या संपत्तीची बरोबरी सोने, चांदी किंवा रत्नाशी होत नाही. ...

आनंदी आयुष्याची सप्तपदी

इमेज
  आनंदी आयुष्याची सप्तपदी सप्तपदी हा शब्द ऐकला तरी आपल्याला आपल्या लग्नातील सप्तपदी आठवते हिंदू धर्मातील लग्नातील   सर्वात महत्वाची रीत म्हणजे सप्तपदी. सप्तपदी ही अग्निच्या साक्षीने सात फेरे घेऊन वधू-वरांनी एकमेकांना सुखी संसारासाठी दिलेली सात वचने असतात आणि या नंतरच वधू आणि वर अधिकृत नवरा-बायको होतात .जशी आपण लग्नावेळी आपल्या साथीदाराला सात वचने देतो तसेच आपण आनंदी रहावे म्हणून आपल्या स्वतःला सात वचने द्यायची आहेत. सातत्याने रोज ही सप्तपदी आपल्याला पुर्ण करायची आहे. तुम्हाला असे कमीत कमी २१ दिवस तरी करायची आहे. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच २१ दिवसांमध्ये जाणवेल.  चला तर मग मैत्रीणीनों आपण ती सप्तपदी कोणती ते पाहूयात.....  १. कृतज्ञता             मैत्रीणीनों, आता तुम्ही म्हणाल कृतज्ञता म्हणजे नक्की काय करायचे, तर आपल्याला हे जीवन परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम डोळे बंद  करुन परमेश्वराचे मनापासून आभार मानायचे आहेत. यानंतर  आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या सर्व लोकांनी मदत केलेली आहे. ...