तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-३
तू आनंदी रहा, पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...
भाग- ३
नमस्कार मैत्रीणीनों,
तुम्ही ज्याची अपेक्षा करता तुम्हाला ते मिळते का ?तुम्हाला कधी अपयश येते का? तुम्ही जास्त चिंता करता का? वरील प्रश्नापैकी एक जरी प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत वाचा..
मी सोनिया खुणे (PROUD POLICE WIFE) "मी हिम्मत पोलिसांची" या ग्रुपची संस्थापिका. मला येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व त्यांना आनंदाने जगायला शिकविणे हाच माझा ध्यास आहे.
चला तर मग सुरुवात करूयात, आपण पहात आहोत पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स-
आपण या अगोदरच्या भाग१ व भाग २ मध्ये काही टिप्स पाहिल्या आहेत. आता आपण पुढील टिप्स पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक सत्यघटना मी तुम्हाला सांगणार आहे.
मैत्रिणींनो,आज आपण जबरदस्त सकारात्मकता असलेल्या एका माउंटेनिअरची सत्य घटना पाहणार आहोत. अरुणिमा सिन्हा यांचा जन्म २० जुलै १९८८ साली उत्तर प्रदेश मधील आंबेडकर नगर या जिल्ह्यात झाला. अरुणिमा सिन्हा यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत केले. माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली अपंग महिला. अरुणिमाला अपघातामुळे अपंगत्व आले होते. राष्ट्रीय स्तरावर हॉलीबॉल खेळणारी खेळाडू असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती. लखनऊ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये चढली. रात्री काही दरोडेखोर येऊन डब्यात घुसले, सगळ्यांना धमकावून जे मिळेल ते घेवू लागले. त्यावेळी अरुणिमाच्या गळ्यातील साखळी घेण्यासाठी दरोडेखोर आले तेव्हा तिने त्यांचा विरोध केला. तेव्हां दरोडेखोर फार चिडले कारण इतर कोणीही त्यांना विरोध करत नव्हते. परंतु एक मुलगी आपल्याला विरोध करत आहे हे पाहून त्या दरोडेखोरांना राग आला व दरोडेखोरांनी भरधाव रेल्वेतून तिला बाहेर ढकलून दिले. त्यावेळी ती खाली दुसऱ्या ट्रॅकवर पडली. तिने उठण्याचा प्रयत्न केला पण ती उठू शकत नव्हती. तिचा पाय रुळावर पडला होता. परंतु तिला तो हलवता येत नव्हता आणि नेमकी त्याच वेळी त्या ट्रॅक वरून एक रेल्वे येत होती आणि तिच्या पायावरून गेली. त्यामुळे तिच्या पायाचा एकदम चुराडा झाला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यावेळी तिला कोणीतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी तिला समजलं की तिचा पाय काढण्याचा निर्णय झाला आहे, त्यामुळे तिला जाणवलं की आपली हाॅलीबॅालची कारकीर्द संपुष्टात येणार आहे. त्याठिकाणी भूल द्यायची सुद्धा सुविधा नसल्या कारणाने तशा परिस्थितीत तिचा पाय कापण्यात आला. त्यानंतर तिला दिल्लीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावेळी दूरचित्रवाणीवरून असे सांगण्यात आले की, तिच्याकडे तिकीट नसल्यामुळे तिने रेल्वेतून उडी टाकली या सर्व घटनांमुळे तिला शारीरिक व मानसिक अघातांना सामोरे जावे लागले. अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला. या घटनेनंतर अरुणिमाने आपले मनोधैर्य खचू दिले नाही. या उलट तिने आपला कृत्रिम पाय घेऊन सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचा निर्णय घेतला आणि ते तिने पार देखील केले. त्यासाठी तिला बचेंद्री पाल या पहिल्या भारतीय महिला माउंट एव्हरेस्ट वीर यांनी पाठिंबा दिला. फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि नेहमी सकारात्मक विचार केला. त्यामुळे तिने माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. असे म्हणतात ना की, 'जिस किसी चीज को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात तुम्हें उसे मिलाने में जूट जाती है'आणि तसेच झाले अरुणिमा जगातील पहिली अपंग महिला एव्हरेस्ट पार करणारी ठरली. तिला यासाठी खूप पुरस्कार भेटले. त्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे २०१५ मध्ये भारत सरकारचा "पद्मश्री पुरस्कार" मिळाला. तसेच तीला "वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ॲवॉर्ड" देखिल भेटले.
७. ज्याची अपेक्षा तुम्ही कराल ते तुम्हाला भेटेल _
मैत्रिणींनो, आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, आपण त्याच गोष्टींकडे आकर्षित होतो म्हणजे काय तर आपण जे विचार करतो तेच घडते.
उदाहरणार्थ- आपण म्हणतो आज सकाळपासून असं वाटतंय की कोणी तरी पाहुणे येणार आहेत. आपण असे घरातील मंडळींना सांगत असतो आणि खरंच त्या दिवशी आपल्याकडे आपले जवळचे कोणीतरी येते, बरोबर ना. म्हणजेच आपण आपल्या डोक्यामध्ये जे विचार करतो आणि अगदी तसेच घडते किंवा आपण असे म्हणत असतो की आज आपल्याला कोणाला तरी फोन करायचा आहे. परंतु फोन हातात घेतो आणि लगेच त्या समोरच्या व्यक्तीचा फोन येतो.
हे झाले सकारात्मकतेची उदाहरणं परंतु विचार हे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. आकर्षणाचा सिद्धांत ही हेच सांगतो की, आपण जो विचार करतो तेच घडते, म्हणजे आपण असे म्हणतो आज मला खूप उदास वाटत आहे तर आपला पूर्ण दिवस उदासच जाणार आहे. परंतु जर आपण सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टीच आपल्याकडे आकर्षित होतील, म्हणूनच म्हणतात 'जो चाहोंगे वही पाओंगे'.
तुम्हाला सकारात्मक विचारांसाठी ४ शब्दांच्या उच्चाराचा फॉर्मुला नक्की मदत करेल.
Faith
Power
Works
Wonders हे चार शब्द आहेत. हे चार शब्द दिवसभरामध्ये सारखे repeat करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकाल. नक्की प्रयत्न करा.
८.माझा अपयशावर विश्वास नाही_
ज्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात ते म्हणजे आपल्या मनातील विचार असतात. आपल्याला याच मनातील विचारांना थांबायचे आहे. जेव्हा आपण एखाद्या अडचणीच्या विरुद्ध उभा राहतो, तेव्हा ती अडचण जास्त ताकतवर नसते. आपण जे करतो त्याविषयी नेहमी चांगले विचार केले पाहिजेत.
A clean engine always delivers power....
So does A mind.
म्हणजे आपले मन जर साफ असेल तर ते साफ इंजिनप्रमाणे जास्त power देईल. आपण जर एखाद्या अडचणी बद्दल आपल्या मनाला समजावले की आपण काहीच नाही करू शकत, हेच आपले मन देखील मानू लागते, परंतु जर आपण आपल्या मनाला एक Positive attitude दिला की मन समजते की मी काहीही करू शकतो. आपल्याला जिंकलो आहे असे वाटू लागते. आपण जर अपयशा विषयी विचार केला तर आपल्याला अपयशच भेटणार आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या धावपटूने विचार केला की, आज माझा पराभव होणार आहे, तर त्याची पळण्याची गती आपोआपच कमी होईल, पण त्याने स्वतः ठरवले की आज काहीही झाले तरी मी आज विजयी होणारच तर त्याच्या अंगामध्ये जास्त ऊर्जा संचारते आणि तो विजयी होतो. म्हणजे काय तर धावपटूने I don't believe in defeat या वाक्यावर विश्वास ठेवला आणि आणि तो जिंकला.
९. चिंता करण्यापासून कसे दूर रहाल _
चिंता एक खतरनाक आणि विनाशकारक मानसिक सवय आहे. या सवयी बरोबर आपण जन्म घेतलेला नाही. आपल्याला ती सवय लागलेली आहे. आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो. चिंता केल्यामुळे हाय ब्लडप्रेशर, हृदयरोग, पॅरालिसीस असे आजार होतात. या आजारामुळे माणसाचे जीवन कमी झाले आहे. आपण आपल्या मनातून चिंता काढून टाकली पाहिजे. आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे कि आपण परमेश्वराच्या मदतीने काहीही करू शकतो. आपल्याला मनाला रिकामे ठेवायला शिकले पाहिजे फक्त मन रिकामे करणे गरजेचे नाही तर त्या रिकाम्या मनाला तुम्ही Fath, Hope आणि Courage ने भरायचे आहे. आपल्याला जर जीवन जास्त आणि आनंदी जगायचे असेल तर, पुढील तीन गोष्टी केल्या पाहिजेत.
*शांत राहिले पाहिजे.
*रोज प्रार्थना केली पाहिजे.
*जीवनात चिंतामुक्त राहिले पाहिजे.
चिंते पासून दूर राहण्यासाठी सकारात्मक लोकांच्या बरोबर राहा, मित्र-मैत्रिणीची, आप्तेष्टांची मदत घ्या.
जर तुम्ही जे हवे आहे ते आकर्षित करू शकत असाल, जर तुम्ही पराभवावर विश्वास ठेवत नसाल, जर तुम्ही चिंतेवर मात करायला शिकला असाल, तर तुम्ही सकारात्मक व आनंदी जीवन जगायला शिकलात.
मला असे अजूनही बरेचसे पाॅईंट तुमच्या सोबत शेअर करायचे आहेत.ते पुढील भागात पाहू.
मैत्रीणीनों, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्यीचं आयुष्य ही बदलू शकतं. तुम्हाला काही समस्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा. तसेच तुम्हीं माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता. कम्युनिटी जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. 👉🏼 मी हिम्मत पोलीसांची.
माझा हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत वाचल्या बद्दल मी तुमची खूप आभारी आहे.🙏🏻
माझा या अगोदरचा ब्लॉग भाग १ व भाग २ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग-१ लिंक 👉🏻
http://mehimmatpolisanchi.blogspot.com/2021/06/blog-post.html
भाग-२ लिंक 👉🏻
http://mehimmatpolisanchi.blogspot.com/2021/06/blog-post_15.html





Powerful thoughts, nice presentation Soniya Tai👍👍
उत्तर द्याहटवाThank you🙏
हटवाखूप सुंदर ब्लॉग लिहलंय सोनिया. Nice images and your positive thoughts 👌. God blessed you
उत्तर द्याहटवाKhup chan mahiti
उत्तर द्याहटवाThank you
हटवाKhup Chan mahiti soniya tai
उत्तर द्याहटवा