तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...
पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...
भाग-२
नमस्कार मैत्रिणींनो,
आपण पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स पाहत आहोत. आपण यामध्ये तीन पॉईंट पाहिलेत.
१.स्वतःवर विश्वास ठेवा.
२.मन शांत ठेवा.
३.सतत ऊर्जा कशी
एकसमान ठेवाल.
वरील पॉईंट मध्ये आपण सकारात्मकतेने कसे जगू शकतो हे पाहिले. माझ्या भाग-१ ब्लॉगसाठी तूम्ही खूप छान प्रतिक्रिया दिल्यात त्यामुळे मी तुमची अत्यंत आभारी आहे. त्यामुळेच मी तुमच्यासाठी आज सकारात्मकतेने जगण्याचे आणखी काही पॉईंट समोर घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत नक्की वाचा.
मी सोनिया खुणे (PROUD POLICE WIFE) मी हिम्मत पोलिसांची या ग्रुपची संस्थापिका.मला येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व आनंदाने जगायला शिकविणे हाच माझा ध्यास आहे.
चला तर मग आपण पुढचे पॉईंट पाहूयात...
४.प्रार्थना शक्तीचा अनुभव घ्या_
आपण बऱ्याच सिनेमा मध्ये पहात असतो की अभिनेता किंवा अभिनेत्री चा एक्सीडेंट झालेला असतो आणि डॉक्टर सांगतात की आता आमच्या हातामध्ये काही नाही तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. असेच आपण रियल लाईफमध्ये कधी कधी अनुभवलेले असते, कोणाचा प्रसंग पाहिलेले असतो किंवा कोणाचा अनुभव ऐकलेला असतो.
म्हणजेच काय तर प्रार्थनेची शक्ती खूप आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. डॉक्टर ए.पी.जेे अब्दुल कलाम यांनी त्यांचे आत्मचरित्र अग्निपंख (Wings of fire) यामध्ये प्रार्थनेचे महत्त्व सांगितले आहे. डॉक्टर सांगतात की मी लहान असताना रोज नमाज पडण्यासाठी वडिलांबरोबर जात असत. अरबी भाषेतील त्या प्रार्थनेचे शब्द कशासाठी आहेत, त्याचा काय अर्थ आहे ते मला त्या लहान वयात कळणे शक्य नव्हते. पण त्या प्रार्थना अल्लाकडे पोहोचतात याबद्दल माझ्या मनात कधीही कुठलीही शंका नव्हती.
माझे वडील नेहमी म्हणत, "त्या दयाळू, कृपाळू अल्लाचे आभार माना".
प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत तेवत असते. दुःख अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते. तुम्हाला योग्य जागी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करते. एकदा का त्या दैवत्वाशी, त्या ज्योतीशी तुमचे अनुबंध जुळले की, तुम्ही मुक्तीच्या,आनंदाच्या, मनःशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता.
आपण आपल्या शरीराला आत्म्याचे देऊळ मानले पाहिजे.
A mam is not spiritually healthy cannot be physically healthy
प्रार्थना आपल्या मनाला, शरीराला आणि ध्येयाला ऊर्जा देत असते.
प्रार्थना करण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत. ज्यामुळे आपली प्रार्थना सक्सेसफुल होऊ शकते.
*आपण प्रार्थना करताना साध्या पद्धतीने केली पाहिजे. जसे आपण आपल्या मैत्रिणीला बोलत असतो त्याप्रमाणे बोलले पाहिजे, आणि प्रार्थना रोज केली पाहिजे.
*प्रार्थना करत असताना तुम्ही ती वस्तू किंवा व्यक्तीचा फोटो पाहून प्रार्थना करू शकता.
उदाहरणार्थ तुम्हाला जर घर हवे असेल आणि त्या घराचा फोटो तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी लावला आणि तशी प्रार्थना रोज केली तर नक्कीच तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल.
*तुमच्या प्रार्थनेचे रुपांतर खरोखर सत्यात होते. तेव्हा देखील तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
*प्रार्थना करताना नकारात्मक शब्द वापरू नका. जसे की, हे होणार नाही ते होणार नाही. तसेच तुम्ही इतरांसाठी देखील प्रार्थना करू शकता.
आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण जगातील शक्तिशाली ऊर्जेचा अनुभव घेतो असतो.
५.स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा_
आपण स्वतः ठरवतो की आपण काय deserve करतो किंवा काय करत नाही. आपल्याला आनंदी राहायचे आहे की नाही हे आपणच ठरवतो. मैत्रिणींनो, आपण आनंदी होतो जितके आपले मन आनंदी असते तितकेच. आपल्याला एका लहान मुलाप्रमाणे असले पाहिजे. आपण पाहतो लहान मुल नेहमी आनंदी असते. त्याच्यावर कुठल्याच नकारात्मक विचारांचा काहीच फरक पडत नाही. आपण देखील त्याच्या प्रमाणे राहायला शिकले पाहिजे. आपल्या सर्वांकडे दोन चॉईस असतात. आनंदी राहा किंवा दुःखी रहा. जे आपण चॉईस करू तेच आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे आपणच ठरवायचे आहे की आपण काय चॉईस करायचे आहे.
आपण दिवसाची सुरुवात करत असताना रोज काही वाक्य बोलू शकतो ज्यामुळे आपला दिवस आनंदी जाईल.
*आजचा दिवस खुप छान असणार आहे.
*मी मानसिक व शारीरिकदृष्ट्या चांगलेच फिल करत आहे.
*माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी परमेश्वराचे आभारी आहे.
*जीवन चांगले आहे जर त्याला आपण चांगले बनवले तर यासाठी आपण नेहमी आनंदाची निवड केली पाहिजे.
६.रागा वैतागाने आदळआपट करू नका_
आपण सर्वांनीच जुने मराठी सिनेमे पाहिले आहेत यामध्ये सासूचा रोल करणारी जी अभिनेत्री असायची ती नेहमी चिडचिडी, आदळआपट करणारी असायची त्यामुळे तिच्या जीवनात खूप अवघड परिस्थिती निर्माण होत असे. यामुळे त्यामुळे उर्जा आणि शक्ती यामध्ये संपून जाते. त्यामुळे ती व्यक्ती कधीच सुखाला आकर्षित करत करू शकत नाही. मग सिनेमाच्या शेवटी तीची अवस्था खूप खराब असायची. आपण जर काही कारणामुळे आपल्या दैनंदिन जीवनात आदळआपट करत असू तर आपण आपल्याकडे कधीच आनंदाला आकर्षित करू शकत नाही .आपण सगळे आता धावपळीचे जीवन जगत आहोत त्यामुळे व्यवस्थित झोपू शकत नाही, योग्य आहार घेऊ शकत नाही. रोज आपल्या शरीराला व मनाला शांत करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या जरुरी कामाला वेळ देतो, त्याप्रमाणेच दिला पाहिजे.
स्वतः ला रिलॅक्स करण्यासाठी काही टिप्स आहेत.
*तुम्ही आरामशीर खुर्चीवर बसा आणि आपल्या डोक्याला शांत करा. थोड्यावेळासाठी एखाद्या शांत सिनचा विचार करा. उदाहरणार्थ :-सूर्योदय, सुर्यास्त, चंद्राची शीतलता. *तुम्ही प्राणायाम करु शकता, ध्यानधारणा करू शकता.
*तसेच तुम्ही छान संगीत देखील ऐकू शकता.
*तुमच्या आवडीचे काम तुम्ही करू शकता.
जर तुम्ही प्रार्थनेची ऊर्जा अनुभवत असाल, जर तुम्ही स्वतःचा आनंद निर्माण करत असाल, जर तुम्ही चिडचिडपणा व आदळआपट यावर मात केली असेल, तर तुम्ही नक्कीच आनंदाने जगायला शिकू शकाल. मला असे अजूनही बरेचसे पाॅईंट तुमच्या सोबत शेअर करायचे आहेत.
मैत्रीणीनों, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेयर जरूर करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्यीचं आयुष्य ही बदलू शकतं. तुम्हाला काही समस्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा. तसेच तुम्हीं माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता. कम्युनिटी जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. 👉🏼 मी हिम्मत पोलीसांची
माझा हा ब्लॉग देखील शेवटपर्यंत वाचल्या बद्दल मी तुमची खूप आभारी आहे.🙏🏻
माझा या अगोदरचा ब्लॉग भाग १ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
ttps://mehimmatpolisanchi.blogspot.com/2021/06/blog-post.htm




Khoop chan Soniya 👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाVery nice Soniya
उत्तर द्याहटवाखूपच छान माहिती दिली आहे.. गृहिणी आनंदी राहणे खूप आवश्यक आहे.
उत्तर द्याहटवारणधीर धनावडे,
संस्थापक - आरोग्यम धनसंपदा
धन्यवाद सर
हटवा