तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स...

पोलीस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... 

भाग-१ 


नमस्कार मैत्रिणींनो,

एक पोलिस पत्नी म्हणून तुम्ही सातत्याने तणाव अनुभवता का? बऱ्याच वेळेला तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायच्या असून देखील तुम्ही आळस करता का? तुमच्या ही मनात असे प्रश्न येतात का? जर वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी आहे. 

तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.चला तर मग सुरुवात करुया...

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विचार माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात आपण पाहतो कि मानवाबरोबर इतर पशुपक्षी देखील भूतलावर राहतात. परंतु फक्त मानवालाच विचार करण्याची ताकद आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या असे म्हणतात, की माणूस एका दिवसामध्ये ६० हजारांपेक्षा जास्त वेगवेगळे विचार करतो त्यात नकारात्मक व सकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, झोपताना सकाळी पाच वाजताचा अलार्म लावून झोपतो सकाळी वाजायला लागला की मनामध्ये दोन विचार येतात बंद कर आणि झोप जरा वेळ आणि त्याच वेळेला दुसरा एक विचार येतो पाच वाजले आहेत आता ऊठ आणि व्यायामाला  लाग तेव्हा आपण तो निर्णय कोणता घ्यायचा आहे आपण स्वतः ठरवायचे आहे.

मी सोनिया खुणे "PROUD POLICE WIFE" मी हिम्मत पोलिसांची या ग्रुपची संस्थापिका, मला येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार पोलिसांच्या पत्नींना व्यक्त व्हायला शिकवणे व त्यांना आनंदाने जगायला शिकवणे हाच माझा ध्यास आहे. 


१.स्वतःवर विश्वास ठेवा-




हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण आपण जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत आपण काही साध्य करू शकत नाही. मी काल एक व्हाट्सअप वर व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एक घोडा दलदलीमध्ये अडकलेला असतो आणि  त्याला पाहणारे लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांना काही बाहेर काढता येत नसते. परंतु त्यांच्यातील एक मनुष्य युक्ती करतो आणि त्या ठिकाणी अजून घोडे आणले जातात आणि ते दलदलीच्या कडेने त्यांना धावायला लावतात. ते पाहून दलदलीत अडकलेला घोडा देखील प्रयत्न करायला लागतो. आणि तो बाहेर येतो.तो इतर घोड्यांना पाहून Motivate होतो आणि बाहेर येतो. म्हणजेच काय तर आपण आपल्या स्वतःबद्दल उगीच न्यूनगंड बाळगून असतो. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास करायला लागतो तेव्हा आपण आपली सर्व कामे, इच्छा-आकांक्षा, पूर्ण करू शकतो.

           श्री. वामनराव पै म्हणतात, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' याप्रमाणे आपण स्वतःला कशाप्रकारे घडवतो त्याप्रमाणे आपण घडत असतो. आपण संध्याकाळी झोपताना व सकाळी उठल्याबरोबर खालील वाक्य बोलून आपल्याला सकारात्मक ठेवू शकतो. 

I can do all with the strength give to me by God. 


२. मन शांत ठेवा-


Mind can be more powerful in there is peace in it.

      Narman Vincent

 आपले मन खूप powerful असेल पण जेव्हा ते शांत असेल तेव्हाच. आपले मन जर शांत असेल तर आपली Health देखील चांगली राहते .तुम्ही कधी तणावामध्ये असाल किंवा काही प्रॉब्लेम मध्ये असाल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत बोलून मन हलके करू शकता. परंतु अशा मैत्रिणीकडे मन मोकळे करा जीच्यावर  तुमचा विश्वास असेल. नाही तर चुकीच्या व्यक्तीसमोर मन मोकळे केले तर जास्त डोकेदुखी होईल. 

जर आपल्याला अशी कोणी मैत्रीण नसेल तर तुम्ही  संध्याकाळी झोपताना आपली चिंता, त्रास, तणाव परमेश्वराला सांगू शकता. त्यामुळे आपले मन शांत होईल आणि झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर देवाचे धन्यवाद  मानून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्याबद्दल्यात परमेश्वर आपल्याला Peaceful mind gift देईल. आपण आपल्या मनाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले पाहिजे. जेव्हा मन शांत असेल तेव्हा आपोआपच आपले विचार सकारात्मक होतील. 


३.ऊर्जा  सातत्याने एकसमान ठेवण्याचा प्रयत्न करा-


पण जेव्हा टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपल्याला लवकर थकल्यासारखे होते. म्हणजेच आपण जेवढा जास्त विचार करतो त्याप्रमाणे आपली बॉडी देखील React करत असते. परंतु आपण जेव्हा आपल्या आवडीचे काम करत असतो तेव्हा ते काम पुर्ण केल्यावर अजून आपली एनर्जी वाढल्यासारखे वाटते.

 आपण जर चांगला आहार घेतला, व्यायाम केला, चांगली झोप घेतली तर या तीन गोष्टींच्या आधारे आपण सतत एनर्जेटिक राहू शकतो. उदाहरणार्थ: अक्षय कुमार त्याचे रुटीनप्रमाणे पहाटे लवकर उठून एक्ससाइज करतो, चांगला आहार घेतो, चांगला आराम करतो. तो या तीन गोष्टींना खूप महत्त्व देतो म्हणूनच तर तो आज सुपरस्टार आहे. जास्तीत जास्त ग्रेट पर्सन नेचर अँड एनर्जी बॅलन्स करत असतात. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचा एक रिदम असतो. आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आपले रिदम त्यांच्याशी मिळून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. 

 Get enough power and support of achieving anything.

 जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, जर तुम्ही मन शांत ठेवायला शिकलात, जर तुम्ही ऊर्जेचे व्यवस्थापन करायला शिकलात,तर नक्कीच तुम्ही आनंदाने जगायला शिकू शकाल. असे सकारात्मक विचार करायला शिकवणारे अजून बरेच पाॅईंट शिल्लक आहेत ते आपण पुढील भागात पाहू.

मैत्रीणीनों, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हांला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेयर जरून करा, कदाचित तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्यीचं आयुष्य ही बदलू शकतं. तुम्हाला काही समस्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स मध्ये जरूर विचारा. तसेच तुम्हीं माझी कम्युनिटी पण जॉईन करू शकता. कम्युनिटी जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. 👉🏼 मी हिम्मत पोलीसांची


माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्या बद्दल आभार.🙏🏻

टिप्पण्या

  1. अप्रतिम ब्लॉग👌. खूप छान लिहलंय👏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-४