पुस्तक दिन

 नमस्कार मैत्रिणींनो,

आज प्रथमच मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आले आहे. माझा आजचा विषय आहे "पुस्तक दिन". तुम्ही म्हणाल पुस्तक दिन, हो कारण आपण सर्वजणी आपल्या संसारामध्ये नोकरीमध्ये अगदी लोणच्या प्रमाणे मुरलेलो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामधील पुस्तकाचे स्थान फारच दुर्मिळ झाले आहे. माझ्या काही मैत्रिणी पुस्तक वाचत असतील परंतु त्यादेखील अगदी बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. म्हणून मी आज पुस्तक दिनाचे औचित्य साधून तुम्हाला भेटायला आले आहे. आपण मागे आपल्या शालेय जीवनात जर गेलो तर आपल्या सर्वांना आठवेल की शाळेच्या भिंतीवर किंवा फळ्यावर नेहमी एक वाक्य लिहिलेले असायचे ते म्हणजे "वाचाल तर वाचाल" तेव्हा अगदी आपण नित्यनेमाने वाचत असायचो. आपले शिक्षक देखील आपल्याला सांगायचे शालेय पुस्तकां बरोबर अवांतर पुस्तके वाचत जा,आपण सर्वजणी तेव्हा पुस्तक वाचन करायचो, परंतु आता आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की,'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' याचा अर्थ असा की ग्रंथरूपी ज्ञानाला महाराज संपत्ती समजतात या संपत्तीची बरोबरी सोने, चांदी किंवा रत्नाशी होत नाही. म्हणून वाचन केले पाहिजे.

      माझे गुरु देखील नेहमी हेच सांगतात, की आपण आज पासून पाच वर्षांनी कोठे असणार आहोत हे फक्त दोन गोष्टींवर अवलंबून आहे एक म्हणजे तुम्ही कोणती पुस्तके वाचता व दुसरे म्हणजे तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या सहवासात राहता आणि हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे. मला वाटतं मैत्रिणींनो, आजच्या दिवसाचे औचित्य साधून आपण सर्वजणी सर्वजणी रोज कमीत कमी एक तास तरी चांगली पुस्तके वाचनासाठी दिला पाहिजे आणि आपल्या नंतर येणाऱ्या पिढीला देखील पुस्तक वाचनाची प्रेरणा दिली पाहिजे. चला तर मग देशासाठी चांगले नागरिक घडवूया... 

 मैत्रिणींनो या आजच्या दिवसाची माझी कल्पना तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व आज पासून थोडा वेळ तरी पुस्तक वाचू या....         

       धन्यवाद,                              

       तुमची मैत्रीण सोनिया

टिप्पण्या

  1. 👌👌👌 धनाची चोरी होऊ शकते पण ज्ञानाची नाही , ऐकलेली माहिती काही काळानंतर विसरू शकतो पण वाचलेली माहिती दीर्घकालीन स्मरण राहते • सोनिया तु खुप छान लिहीतेस •

    उत्तर द्याहटवा
  2. Superb idea Di👍एकच गोष्ट अशी आहे जी, जेवढी द्याल त्याच्या मुबलक प्रमाणात वाढते... "That is knowledge."..And we can easily gain knowledge by books.....

    उत्तर द्याहटवा
  3. Khup chan prytn krtey tu lihinycha , ata je post kels te khup chan lhil aahes👍👌keep it up👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-४