आनंदी आयुष्याची सप्तपदी

 आनंदी आयुष्याची सप्तपदी


सप्तपदी हा शब्द ऐकला तरी आपल्याला आपल्या लग्नातील सप्तपदी आठवते हिंदू धर्मातील लग्नातील   सर्वात महत्वाची रीत म्हणजे सप्तपदी. सप्तपदी ही अग्निच्या साक्षीने सात फेरे घेऊन वधू-वरांनी एकमेकांना सुखी संसारासाठी दिलेली सात वचने असतात आणि या नंतरच वधू आणि वर अधिकृत नवरा-बायको होतात .जशी आपण लग्नावेळी आपल्या साथीदाराला सात वचने देतो तसेच आपण आनंदी रहावे म्हणून आपल्या स्वतःला सात वचने द्यायची आहेत. सातत्याने रोज ही सप्तपदी आपल्याला पुर्ण करायची आहे. तुम्हाला असे कमीत कमी २१ दिवस तरी करायची आहे. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच २१ दिवसांमध्ये जाणवेल. 

चला तर मग मैत्रीणीनों आपण ती सप्तपदी कोणती ते पाहूयात..... 

१. कृतज्ञता         

 

 मैत्रीणीनों, आता तुम्ही म्हणाल कृतज्ञता म्हणजे नक्की काय करायचे, तर आपल्याला हे जीवन परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम डोळे बंद  करुन परमेश्वराचे मनापासून आभार मानायचे आहेत. यानंतर  आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या सर्व लोकांनी मदत केलेली आहे. त्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानायचे आहेत असे केल्यामुळे आपले मन आनंदी होईल.

२. ध्येय वाचने             


तुम्ही म्हणाल हे काय? आपल्या सर्वांची छोटी मोठी ध्येय असतात. यासाठी मी तुम्हाला माझे उदाहरण देते. माझे ध्येय आहे की मला माझ्या सारख्या ज्या पोलीसपत्नी आहेत त्यांना त्यांचे अस्तित्व निर्माण करायला, त्यांना व्यक्त व्हायला आणि त्यांना आनंदाने जगायला शिकवायचे आहे. त्यासाठी मला त्यांना सकारात्मक ऊर्जा द्यायची आहे. हे मी एक कार्ड वर लिहिले आहे, आणि ते मी रोज दिवसातून दोन ते तीन वेळा वाचन करते. म्हणजे मी माझ्या ध्येयाला ऊर्जा देते आणि ते मी पूर्ण झाले आहे असे अनुभवते. हा नियम आहे Law of attraction. 

३. शारीरिक व्यायाम       


यामध्ये तुम्ही चालू शकता, पळू शकता किंवा झुम्बा देखील करू शकता. तुम्ही २० ते ३० मिनिटे घाम येईपर्यंत हे करा यामुळे तुमचे शरीर फ्रेश होईल.                          

    ४. वाचन    

 यामध्ये तुम्ही चांगली पुस्तके वाचू शकता किंवा ऐकू शकता. तुमच्या व्यवसायाच्या निगडीत तुम्ही पुस्तके वाचू शकता व त्याचे संक्षिप्त मध्ये माहिती लिहून ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या  व्यवसायामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. जर तुम्ही होममेकर असाल तर तुम्ही तुमच्या छंदाविषयीची किंवा तुमच्या आवडणाऱ्या  लेखकांची पुस्तके वाचू शकता त्यामुळे तुमचे विचार सकारात्मक व कृतीशील होतील. जर तुम्हाला वेळ असेल नसेल तर तुम्ही सकाळी वॉकिंग करताना ऑडिओ बुक ऐकू शकता, म्हणजे एकाच वेळेला शरीर व मनाचा दोन्ही व्यायाम होतील.                

   ५. ध्यान       


  आपण ज्याप्रमाणे शरीराचा व्यायाम करतो, त्याचप्रमाणे मनाचा व्यायाम करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. मनाचा व्यायाम आपण ध्यानाच्या माध्यमातून करू शकतो. यासाठी तुम्ही १० ते १५ मिनिटे मेडिटेशन करा हे कमीत कमी दिवसातून दोन वेळा तरी करा.          

६. नियोजन 


  तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन करा. त्याचप्रमाणे आठवडा, महिना, वर्षाचे असेही नियोजन करा म्हणजे तुम्हाला तुमची प्रगती कळेल व वेळेची बचतही होईल.    

 ७.स्वतः कौतुक करा


तुम्ही संध्याकाळी आरशासमोर उभे रहा. स्वतःचा चेहरा पाहून छान हसा. आणि आज दिवसभर जे काही चांगले काम केले त्याबद्दल स्वतःला शाब्बासकी द्या. मनातल्या स्वतःची पाठ थोपटा व स्वतःला आय लव यु म्हणा. यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल.

 तुम्ही ही सप्तपदी स्वतःला वचन दिल्याप्रमाणे जर २१ दिवस नित्यनियमाने केली तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. तुमच्या मध्ये आत्मविश्वास देखील वाढेल तुम्ही अंतर्बाह्य बदलून जाल. जर तुम्ही हे सातत्याने असेच केले, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंदी राहू शकाल व तुम्हाला दुःख पचवण्यासाठी देखील ताकद मिळेल. कारण दुःखाशिवाय तर सुखाची किंमत होऊ शकत नाही.   

          चला तर मग आनंदी आयुष्याची सप्तपदीची आपण आज आजपासूनच सुरुवात करूया. 

  मैत्रीणींनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व comment जरूर करा आणि share करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं आयुष्य ही बदलू शकता. माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी आपली. आभारी आहे.  

"All the best for happy life "

          ✍✍ तुमची मैत्रीण सोनिया

टिप्पण्या

  1. "स्व" ची जाणीव करून देणारा लेख याची खरच गरज आहे 💃प्रत्येक स्त्री ला🤝👍❤

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच खूप छान लिहिले आहे आणि फोटो पण खूप छान वाचताना फ्रेश वाटत होते

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर लेख सोनिया. खूप छान वाटतंय लेख वाचून

    उत्तर द्याहटवा
  4. Very positive and inspirational.👍👍...the seven step of happy and peaceful life.... Brilliant thought 👌✌️

    उत्तर द्याहटवा
  5. Very positive and inspirational 👍the seven steps of happy and peaceful life... #the brilliant thought 👍👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू आनंदी रहा,पोलिस पत्नींना सकारात्मकतेने जीवन जगायला शिकवणाऱ्या १७ टिप्स... भाग-४